राज्यात 17 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या शाळांचा निर्णय लांबणीवर?

मुंबई ।  उच्च न्यायालयानं अकरावीची सीईटी परीक्षा रद्द केली. त्यामुळे अकरावी प्रवेशप्रक्रियेवेळी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. अंतर्गत मुल्यमापनद्वारे जे गुण विद्यार्थ्यांना दहावीत मिळाले आहेत. त्या गुणांच्या आधारे आता अकरावीत प्रवेश करावा लागणार आहे. त्यामुळे यावर्षी दहावीच्या ऐतिहासिक निकालामुळे आलेला गुणांचा फुगवटा आणि 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवतांची संख्या पाहता नामांकित कॉलेजमध्ये 95 टक्के गुणसुद्धा कमी पडणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

 

दरम्यान, अकरावी सीईटी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं सुनावला. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर झालेला दहावीचा निकाल आणि त्यात मिळालेले भरघोस नव्वदीच्या पार गुण. त्यामुळे 90 टक्के पेक्षा जास्त गुण जरी मिळाले असतील तरी तुम्हाला नामांकित कॉलेज मिळेल याची शाश्वती नाही.

You May Also Like