करोनाच्या पार्श्वभूमीवर NEET- PG परीक्षा 4 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय

मुंबई : करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर  देशातील अनेक परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले असून अनेक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार वैद्यकीय कर्मचार्‍यांची उपलब्धता वाढवण्यासाठी पंतप्रधानांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयांपैकी एक निर्णय म्हणजे NEET-PG परीक्षेला कमीत कमी 4 महिने पुढे ढकलले आहे.

PMO म्हणाले की, कोविडमध्ये आपले कर्तव्य पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचार्‍यांना शासकीय भरतींमध्ये प्राधान्य दिले जाईल. मेडिकल इंटर्न्सला त्यांच्या शिक्षकांच्या देखरेखीखाली कोविडच्या व्यवस्थापनासाठी तयार केले जाईल.

PMO ने सांगितले की, MBBSच्या फायनल इयरच्या विद्यार्थींना माईल्ड कोविड रुग्णांच्या टेली कंसल्टेशन आणि मॉनिटरिंगचे काम दिले जाईल. विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांच्या देखरेखीखाली हे काम करतील. तर BSc/GNM पात्र परिचारिकां वरिष्ठ डॉक्टर आणि परिचारिकांच्या देखरेखीखाली पूर्णवेळ कोविड नर्सिंग ड्यूटीमध्ये काम करतील.

रविवारी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरंसींगद्वारे आरोग्य तज्ञांशी बैठक घेतली. हे सर्व निर्णय या बैठकीतच घेण्यात आले. रविवारी दुपारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेला पुढे ढकलले जाऊ शकते. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीवर आज पंतप्रधान कार्यालयाकडून शिक्कामोर्तब झाला आहे आणि लवकरच याची नोटिस काढली जाईल.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like