उपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत

टोकियो ।   पहिले ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न पाहत असलेल्या भारताला तिरंदाजीत मोठा धक्का बसला आहे. फॉर्ममध्ये असलेली भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिला महिलांच्या तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून, ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे तिचे स्वप्न भंगले आहे.

 

 

आज दीपिका कुमारी आणि कोरियाची सॅन अन यांच्यात झालेल्या लढतीमध्ये दीपिकाचा फॉर्म दिसलाच नाही. तिचा बऱ्याचदा तिचा निशाणा भरकटलेला दिसला. पहिल्या सेटमध्ये सॅन अॅनने तीनवेळा फरफेक्ट १० निशाणा साधत सेट जिंकला. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सेटही सॅन अॅनच्या नावे राहिला. त्यामुळे तिने दीपिकाचे आव्हान सहजपणे परतवून लावत उपांत्य फेरी गाठली.

 

You May Also Like