दिल्ली : विराट कोहली, रोहित शर्मा यांना गोलंदाजी करणं अजिबात आव्हानात्मक नाही, मोहम्मद आमीरचा दावा

दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हे जगातील दोन सर्वोत्तम फलंदाज आहेत. विराट व रोहित यांच्या फटकेबाजीमुळे अनेक गोलंदाजांची झोप उडाली आहे. अनेक गोलंदाजांनी ते मान्यही केले आहेत. पण, पाकिस्तानी संघाचा माजी गोलंजाज मोहम्मद आमीर याला तसं वाटत नाही. आमीर हाही जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे, यात वाद नाही. पण, त्याच्या मते विराट व रोहित हे जगातील आव्हानात्मक फलंदाज अजिबात नाहीत. BCCIला २५०० कोटींची चिंता; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत बदल करण्याची ECBला विनंती?

त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत त्याला विराट व रोहित यांना गोलंदाजी करताना कधीच आव्हान वाटले नाही. त्यानं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला गोलंदाजी करणं अधिक आव्हानात्मक असल्याचे सांगितले. त्याचे फलंदाजीचे तंत्र तोडणे अवघड असल्याचे तो म्हणाला. ”मला कोणाला गोलंदाजी करताना आव्हान वाटलं असेल, तर ती स्टीव्ह स्मिथला. त्याची फलंदाजीची शैली ही वेगळी आहे. तो फलंदाजीला अशा पद्धतीनं उभा राहतो की त्याला नेमकी गोलंदाजी कशी करावी, हेच कळत नाही. त्याला आऊट-स्वींग टाकला तर तो बॅट वर करून चेंडू सोडून देतो. चेंडू पॅडवर टाकला तर तो फ्लिक करतो. त्यामुळे त्याला गोलंदाजी करणं आव्हानात्मक आहे,”असे तो म्हणाला

You May Also Like