‘डेल्टा प्लस’: मुंबईत 63 वर्षीय महिलेने गमावला जीव

मुंबई । करोनाच्या नवीन व्हेरिएंटचा प्रसार राज्यात वाढू लागला आहे. घाटकोपरमधील एका 63 वर्षीय महिलेचा डेल्टा व्हेरिएंटमुळे मृत्यू असून हा मुंबईतील पहिला मृत्यू आहे. दरम्यान, 21 जुलै रोजी ही महिला संक्रमित झाली होती, त्यानंतर उपचारादरम्यान 27 जुलै रोजी तीने रुग्णालयात जीव सोडला. तसंच गुरुवारी आलेल्या अहवालातून संबंधित महिलेचा मृत्यू डेल्टा व्हेरिएंटमुळे झाले असल्याचे समोर आले होते.  या महिलेने लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. आता  डेल्टा प्लस व्हेरिएंटने ही राज्यात आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे.

 

राज्यात डेल्टा व्हेरिएंटमुळे आतापर्यंत दोन मृत्यू झाले आहे. यापूर्वी 13 जून रोजी रत्नागिरीत 80 वर्षीय महिलेचा यामुळे मृत्यू झाला होता. मुंबईत 7 लोक डेल्टा व्हेरिएंट संक्रमित असल्याचे राज्य सरकारने बीएमसीला सांगितले होते. त्यानंतर बीएमसीने संबंधित भागाचा सर्वे करत लोकांशी संवाद साधला. दरम्यान, घाटकोपरमध्ये मृत्यू झालेली महिलेचा यात 7 लोकांमध्ये समावेश होता.

You May Also Like