ठाण्यात डेल्टाची एन्ट्री; रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क

ठाणे । महाराष्ट्र राज्य करोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत आहे. तोपर्यंत आता कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटचं नवं संकट राज्यासमोर उभं ठाकलं आहे. नाशिक, मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही डेल्टा संसर्गाचा  शिरकाव झाल आहे. ठाण्यात डेल्टाची बाधा झालेले चार रुग्ण आढळले आहेत. संबंधित सर्व रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण आढळल्यानंतर ठाणे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

 

 

नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. आज ठाणे परिसरात आढळलेल्या एकूण चार डेल्टा व्हेरिअंट बाधित रुग्णांमध्ये 25 वर्षांखालील 3 रुग्ण आहेत, तर एक रुग्ण 53 वर्षांचा आहे. नाशिक आणि मुंबई पाठोपाठ ठाण्यात डेल्टा व्हेरिअंटने धडक घेतल्यानं नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे.

You May Also Like