’द फॅमिली मॅन 2’ सीरिज बॉयकॉटची होतेय मागणी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी, दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणी आणि अभिनेत्री सामंथा यांच्या दर्जेदार अभिनयाने सजलेली ’ द फॅमिली मॅन 2’ समोरील संकटं संपायचं नाव घेत नाहीये. 4 जूनला प्रदर्शित झालेल्या ’द फॅमिली मॅन 2’ वेबसीरिजचं प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक करण्यात येत आहे. ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून चाहत्यांकडून वेबसीरिजमधील कलाकारांचं देखील कौतुक करण्यात येत आहे. परंतु, दुसरीकडे तामिळ प्रेक्षक मात्र अजूनही वेबसीरिज विरोधात आहेत. वेबसीरिजमधून तामिळ क्षेत्र चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. तर ट्विटरवर देखील वेबसीरिजला बॉयकॉट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

दरम्याण, काही दिवसांपूर्वी वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हाही तामिळ जनतेने या वेबसीरिजचा विरोध केला होता. परंतु, त्यावेळेस वेबसीरिजचे निर्माते आणि कलाकारांनी प्रेक्षकांना आधी वेबसीरिज पाहून मग मत बनवण्याची विनंती केली होती. आता वेबसीरिज प्रदर्शित होऊनही प्रेक्षकांचा विरोध कायम आहे. आता तर वातावरण आणखीनच तापलं आहे. पुन्हा एकदा ट्विटरवर ’फॅमिली मॅन 2’ विरोधात ऋराळश्रूारप2_रसरळपीीं_ींराळश्र हॅशटॅग ट्रेण्ड करत आहे. या वेबसीरिजद्वारे तामिळ क्षेत्राबद्दल चुकीचे संदेश पसरवले जात असल्याचं तामिळ प्रेक्षकांचं म्हणणं आहे.

You May Also Like

error: Content is protected !!