अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी….

नाशिक :  डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये ऑक्सिजन गळतीमुळे तब्बल करोनाचे २९ रुग्ण दगावल्याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यासह संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काल स्थायी समितीच्या सभेत सर्वच संतप्त सदस्यांनी एकमुखाने केली. दरम्यान या घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारच्या पाठोपाठ महापालिकेतर्फेही आयुक्त कैलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे घोषित करण्यात येऊन यामध्ये तीन तांत्रिक तज्ञांचा समावेश करण्यात येत असल्याची घोषणा सभापती गणेश गीते यांनी केली. दरम्यान काल भद्रकाली पोलीस ठाण्यांमध्ये या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीची सभा काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. यावेळी प्रारंभी सर्वच सदस्यांनी ऑक्सीजन गळती प्रकरणी घटनेमध्ये बळी पडलेल्या मृत्यू पडलेल्या रुग्णांविषय सहानुभूती व्यक्त करत घटनेची तात्काळ चौकशी व्हावी. तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांसह संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी उचलून धरली. यामुळे काही काळ सभेमध्ये गोंधळ उडत व्यत्यय आला. सभापती गीते यांनी करोना विषयक आवश्यक वस्तूंची खरेदी करून करोना बाबतच्या कामकाजाला प्राधान्य द्यावे, त्याबाबत कुठलीही तक्रार निर्माण होणार नाही. याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

नाशिक शहरात करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रेमडेसीवर हे इंजेक्शन त्वरित १० हजार खरेदी करण्यात यावे. सध्या दररोज ५०० नग इंजेक्शन घेत आहे त्यात वाढ करून १ हजार इंजेक्शन हे मनपा नगरसेवक, पदाधिकारी,कर्मचारी, अधिकारी व स्वयंसेवी संस्थांसाठी उपलब्ध करून देण्यासाठ व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आल्या. मनपाच्या वतीने ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेशन किट तातडीने खरेदी करण्याबाबत यावेळी वैद्यकीय विभागास सूचना देण्यात आल्या. डॉक्टर, नर्सेस, फ्रंट लाईन वर्कर, सफाई कर्मचारी, करोनामध्ये काम करणारे कर्मचारी व मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा विमा काढण्याची घोषणा करण्यात आली. मनपाच्या बिटको रुग्णालयातील सिटीस्कॅन, सोनोग्राफी मशीन हे तातडीने सुरु करण्यात येणार आहे. डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयात ऑक्सीजन गळतीची घटना घडली त्याच्या चौकशीसाठी मनपा स्थायी समितीचे ४ सदस्य व बाहेरील तज्ञ अधिकारी यांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ऑक्सिजनबाबतचे ऑडिट करण्यासाठी मनपा अधिकारी व स्थायी समिती सदस्यांची समिती गठित करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

खाजगी हॉस्पिटलकडून रुग्णांना आकारणी येणाऱ्या बिलांच्या तपासणीसाठी प्रत्येक रुग्णालय निहाय ऑडिटरची मनपाच्या वतीने नेमणूक केली आहे. मात्र तरी देखील अद्याप तक्रारी येत असल्याने त्याच्या चौकशीसाठी मनपाच्या स्थायी समिती सदस्यांची समिती गठित करण्यात येणार आहे. मानधनावर नियुक्त कर्मचाऱ्यांना वेळेत पगार द्यावेत असे आदेश सभापती गणेश गीते यांनी दिले. दरम्यान या स्थायी समितीच्या बैठकीत सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, राहुल दिवे, माधुरी बोलकर, सलीम शेख, योगेश हिरे, हिमगौरी आडके, प्रतिभा पवार, इंदूबाई नागरे, रत्नमाला राणे, मुकेश शहाणे, रंजना भानसी समीना मेमन यांनी सहभाग घेतला.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like

error: Content is protected !!