अफगाणीस्तानातील युद्धजन्य परिस्थितीत बिघाड

भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्याचे आवाहन

नवी दिल्ली । अफगाणीस्तानातील परिस्थितीत बिघाड होत असून मझर ए शरीफ या शहरात राहणाऱ्या सर्व भारतीय नागरीकांना मायदेशी परत येण्याचे आवाहन भारत सरकार कडून करण्यात येत आहे. या शहरावर हल्ला करण्याची तयारी तालिबानने केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

दरम्यान, आज सायंकाळी उशीरा नवी दिल्लीसाठी विशेष विमान मझर ए शरीफहून सुटेल. या शहरात आणि आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी त्याद्वारे मायदेशी परतावे, असे आवाहन भारताच्या या शहरातील राजदुतांनी ट्‌विटद्वारे केले आहे. या विशेष विमानाने जाऊ इचिछणाऱ्यांनी त्यांचे पूर्ण नाव, पासपोर्ट क्रमांक आणि त्याची मुदत संपण्याची तारीख 0785891303/01 या क्रमांकावर पाठवावीत, असे आवाहन करणारे दुसरे ट्‌विट त्यांनी केले आहे. तालिबान शहरात प्रवेश केल्याने भारतातने कंदहार दुतावासातील कर्मचाऱ्यांना हलवले आहे. तालिबानने अफगाणस्तिानच्या उत्तरेकडील सहा प्रांतावर ताबा मिळवला आहे. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या सुरक्षित असणाऱ्या काबुलसारख्या शहरांमध्ये लाखो लोकांनी घरदार सोडून आश्रय घेतला आहे.

You May Also Like

error: Content is protected !!