धुळे : दीक्षाभूमी सारखे भव्य बुद्धविहार शहरात साकारण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी

धुळे : दीक्षाभूमी सारखे भव्य बुद्धविहार शहरात साकारण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी आ.फारूक शाह यांनी मंजूर करून आला आहे . निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
बुद्धपौणिमेच्या निमित्ताने आ.फारूक शाह यांनी मंगळवारी मंत्रालयात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेत पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली त्यानुसार मंत्री मुंडे यांनी बुद्ध विहारासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली शहरात एकही मोठे बुद्धविहार नाही त्यादृष्टीने आ. शाह यांनी सामाजिक न्याय मंत्र्यांकडे बुद्ध विहारासाठी निधी देण्याची मागणी केली. शहरात महानगरपालिका क्षेत्रात सुमारे तीन एकर जागेत बुद्ध विहार साकारण्यात येणार आहे नागपूर येथील दिक्षाभूमीच्या धर्तीवर हे बुद्ध विहार उभारले जाईल जात विपश्यना गृह, भिक्कु निवास , कॉन्फरन्स हॉल चे बांधकाम होईल , उर्वरित जागेत उद्यान तयार केले जाईल अशी माहिती आ.शाह यांनी दिली.

You May Also Like

error: Content is protected !!