coronavirus : विवाहाचा खर्च टाळत मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

अमळनेर : जगभरात थैमान घातलेल्या करोना व्हायरसमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभर लॉकडाऊन असल्यामुळे धार्मिक, सार्वजनिक, विवाह आदी सगळ ठप्प असून फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू आहे. सरकारने नागरिकांना करोनाग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले आहे. यालाच साद घालत अमळनेर तालुक्यातील मुडी गावातील संदिप पाटील व मोहिनी पाटील यांनी आपला दि.6 एप्रिल रोजी होणारा विवाह करोनामुळे पुढे ढकलण्याबरोबरच साध्या पद्धतीने करून विवाहाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचे ठरविले आहे. पाटील कुटुंबाने नागरिकांना करोनाबाधितांसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. पाटील कुटुंबाचे अमळनेर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

 

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.