coronavirus : धुळ्यात दुचाकी, चारचाकी न वापरण्याचे पोलिसांकडून आवाहन

धुळे : करोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता केंद्र शासनाने लॉकडाऊन घोषीत करून जनतेला घराबाहेर निघण्याबाबत कठोर निबर्ंध लादले आहेत. तरी देखील नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली शहरात हिंडत आहे. त्यातुन करोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असून धुळ्यात दुचाकी, चारचाकी नागरिकांनी वापरू नये असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विभागात दुध, भाजीपाला, किराणा व इतर जिवनाश्यक वस्तू खरेदी करावे. तसेच खरेदी करण्यास जाणेकरीता पायी जावे असे पोलिस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे प्रत्येक विभागात दुध, भाजीपाला, किराणा व इतर जिवनाश्यक वस्तू विक्रीचे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरी ही बरेचसे नागरीक दुध, भाजीपाला, किराणा व इतर जिवनाश्यक वस्तु खरेदीच्या नावाखाली दुचाकीवरून शहरात विनाकारण अनावश्यक फिरतांना दिसून येत आहे.

यापुढे कोणीही नागरीक शहरात दुचाकी वाहनांवर अनावश्यक फिरतांना मिळून आल्यास पोलीस प्रशासनातर्फे सदरचे वाहन जप्त करून वाहनावरील सर्व व्यक्तींवर गुन्हे दाखल करून सक्त कारवाई करण्यात येईल यांची नोंद द्यावी.

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.