औरंगाबाद मनपाची अनोखी शक्कल; विनाकारण बाहेर फिरल्यास थेट अँटिजेन टेस्ट

औरंगाबाद  :करोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता औरंगाबादचा क्रमांकही वरच्या बाजुलाच आहे. शहरात रोज जवळपास दीड हजारांहून अधिक करोना रुग्ण आढळत आहे. करोनाची साखळी तोडून रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्याच्या हेतूनं राज्याच ब्रेक द चेन अंतर्गत कडक लॉकडाऊन आणि संचारबंदी लावण्यात आली आहे. काही सेवांना यातून सूट दिलेली असली तरी काही लोक विनाकारण रस्त्यांवर फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

संचारबंदीच्या काळात विनाकारण कारणं सांगून बाहेर फिरणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी औरंगाबाद मनपानं  एक शक्कल काढलीय. त्यानुसार आता विनाकारण फिरताना आढळणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट केली जाणार आहे. शहरातील विविध चौकात पोलिस आणि प्रशासनाकडून ही मोहीम राबवायला सुरुवातही करण्यात आली आहे.  मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.

विशेष म्हणजे शिफ्टनुसार दोन पथकं यासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती पांडेय यांनी दिली आहे. सकाळी 9 ते रात्री एक वाजेपर्यंत ही पथकं कारवाई करणार आहेत. अशा प्रकारची 12 मोबाईल पथकं यासाठी तैनात करण्यात आली आहेत. यासाठी महानगर पालिकेने एका व्हॅनमध्ये चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्हॅनसह हे पथक शहरात फिरेल. विनाकारण फिरताना दिसणाऱ्यांची हे पथक अँटिजेन चाचणी करणार आहे. शहरातल्या सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या ठिकाणांवर पोलिस आणि प्रशासनाची सर्वाधिक नजर असणार आहे.

शुक्रवार म्हणजेच आज पासून या मोहिमेला सुरुवात झाली असून एका जणांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं त्याला मनपाच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्याची माहितीही मिळाली आहे. त्यामुळं तुम्ही जर औरंगाबादेत असाल तर बाहेर पडण्यापूर्वी खरंच काम महत्त्वाचं आहे का याचा विचार करा. कारण बाहेर गेल्यावर तुम्हाला चाचणीला सामोरं जावं लागू शकतं.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

You May Also Like