प्रशांत किशोर व राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यात बंददाराआड गेल्या दीड तासांपासून चर्चा सुरू

मुंबई : प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यात बंददाराआड गेल्या दीड तासांपासून चर्चा सुरू आहे. यावेळी बंगाल मॉडेल देशात आणि महाराष्ट्रात लागू करण्याबाबत तसेच राज्यातील मविआ मॉडेल देशात लागू करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं. ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही सिल्व्हर ओकवर दाखल झाल्याने या बैठकीत मोठा निर्णय होण्याचे कयास लढवले जात आहेत.

प्रशांत किशोर यांनी आज अचानक शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी त्यांना भेटायला आले. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, गेल्या दीड तासांपासून या दोघांमध्ये चर्चा सुरू अस्लयाने ही सदिच्छा भेट नसल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय जयंत पाटीलही या चर्चेत सहभागी होण्यासाठी पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्याने ही भेट निव्वळ राजकीय असल्याचं राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

जयंत पाटील का आले?

जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि पालिका निवडणुका या पाटील यांच्या अध्यक्षतेखालीच लढवल्या जाणार आहेत. त्यामुळे निवडणुकीत काय स्ट्रॅटेजी असावी याची पाटील यांनाही माहिती असावी यासाठी पाटील यांना तातडीने सिल्व्हर ओकवर बोलावून घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

चर्चा काय?

गेल्या दीड तासांपासून या बैठकीत राजकीय घडामोडींवर चर्चा सुरू आहे. कोरोना संकटामुळे बदललेली राजकीय परिस्थिती आणि नागरिकांची मानसिकता याविषयीही चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीत राज्यात आणि महाराष्ट्रात बंगाल मॉडल लागू करता येऊ शकतं का? तसेच राज्यातील मविआ मॉडेल देशात किंवा राज्या राज्यांमध्ये लागू होऊ शकतं का? कोणत्या राज्यांमध्ये अशा प्रकारचे मॉडल लागू होऊ शकते? त्यासाठी विरोधी विचारधारा असलेले कोणते राजकीय पक्ष जवळ येऊ शकतात, यावरही चर्चा होत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. तसेच 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी नेतृत्व करावं की ममता बॅनर्जी यांनी नेतृत्व करावं, यावरही चर्चा होत असल्यांच सूत्रांचं म्हणणं आहे.

You May Also Like

error: Content is protected !!