कृषी पायाभूत सुविधा निधीद्वारे 746 कोटींचं वितरण

नवी दिल्ली।  केंद्र सरकारकडून कृषी पायाभूत सुविधा निधीकडून 746 कोटी रुपये वितरित केले गेले आहेत.  तर मध्य प्रदेशातील आगामी 759 प्रकल्पांसाठी 427 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर राजस्थानमधील 145 प्रकल्पांना 84.4 कोटी, महाराष्ट्रातील 84 प्रकल्पांना 66.4 कोटी आणि गुजरातमधील 62 प्रक्लपांना 62 कोटी रुपये देण्यात आले.

 

 

या दरम्यान,  कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले कि,  कृषी मंत्रालयाने आतापर्यंत 6403 प्रकल्पांना कृषी पायाभूत सुविधा निधीतून एकूण 4389 कोटी रुपये मंजूर केले आहेत. कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड ही एक मध्यम-दीर्घ मुदतीची पतपुरवठा करणारी सुविधा आहे. याद्वारे व्यवस्थापन पायाभूत सुविधा आणि व्याज सहायता आणि क्रेडिट गॅरंटीद्वारे शेती संबंधित प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली जाते.

 

 

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा कालावधी आर्थिक वर्ष 2029 पर्यंत आहे. या योजनेचा कालावधी एकूण 10 वर्षे आहे. या योजनेंतर्गत बँक आणि वित्तीय संस्थांकडून वर्षाला तीन टक्के व्याजावर कर्ज आणि दोन कोटी रुपयांपर्यंतची क्रेडिट गॅरंटी कव्हरेज म्हणून एक लाख कोटी रुपये देण्यात येणार आहेत. संसदेला दिलेल्या माहितीनुसार, याअंतर्गत आंध्र प्रदेशातील 1,318 प्रकल्पांना कमाल 1,446.7 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मात्र, मंत्रालयाने 11 प्रकल्पांसाठी या दक्षिणेकडील राज्यात केवळ 7.5 कोटी रुपये दिले आहेत.

You May Also Like