रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याची रुग्णांच्या नातेवाईकांना सक्ती करू नका : आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना: .राज्यात वाढत्या करोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सवेंचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, त्याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालना जिल्हा प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याची सक्ती करू नका, जिल्हा प्रशासनानेच या इंजेक्शनचा पुरवठा करावा, असे निर्देश राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

राजेश टोपे यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली होती. यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे , जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अतिरित्क पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्यचित्किसक डॉ. अर्चना भोसले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगांवकर, नगर परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी नार्वेकर, डॉ. संतोष कडले, डॉ. संजय जगताप आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे आदेश दिले.

 

 

You May Also Like