नाशिक : ‘रेमडेसिविर’ २५ हजारांना विकतांना डॉक्टरला अटक

नाशिक : राज्यासह नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात करोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे, त्यातच रुग्णांना उपचार मिळत नसल्याने हि चिंता अधिकच वाढत चालली आहे. दरम्यान, रेमडेसीवर या इंजेक्शन साठी नातलगांची धावपळ सुरु असतानामात्र दुसरीकडे एक डॉक्टरच ‘रेमडेसिविर’चा काळाबाजार करताना आढळून आला आहे.

अमृतधाम भागात एक खासगी डॉक्टरच रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचे उघडकीस आले आहे. रेमडेसिविर इंजेक्शन २५ हजारांना विकणाऱ्या संशयित डॉ.रवींद्र श्रीधर मुळक(40) यास पंचवटी पोलिसांनी रविवारी रात्री उशीरा अमृतधाम भागातून ताब्यात घेतले आहे.

तक्रारदारास रेमडेसीवर आवश्यक असल्याने त्याने डॉक्टरांशी संपर्क साधला. यावेळी मूलक यांनी तीन रेमडेसिवीर इंजेक्शन असल्याचे तक्रारदारास सांगितले होते. एका रेमडेसिविर इंजेक्शनची किंमत २५ हजार रुपये असल्याचेही सांगितले. त्यानुसार तक्रादाराने खरेदीची तयारी दर्शविली. ५ हजार रुपये कमी पडत असल्याचे सांगत एटीएममध्ये जाऊन येतो असे सांगून तक्रारदाराने 100 क्रमांकावर कॉल करत थेट पोलिसांना याबाबत माहिती दिली.

दरम्यान, घटनेची माहिती पंचवटी पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस पथकाने अन्न औषध प्रशासनाच्या पथकाला सोबत घेत घटनास्थळ गाठले. तेथे एका कारमध्ये मुळक हे रेमडेसिविर इंजेक्शनच्या तीन बाटल्या (वायल्स) घेऊन ग्राहकाची येण्याची प्रतीक्षा करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांचच्या कारची झडती घेऊन इंजेक्शनच्या तीन बाटल्या जप्त केल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

 

You May Also Like