मुंबई । गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ गायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर दीदींना रुग्णालयात आणण्यात आलं. जिथं त्यांच्यावर उपचार सुरु झाले.
पुढे दर दिवशी अनेकांकडूनच दीदींच्या आरोग्याबाबत चिंचा व्यक्त केली जाऊ लागली.
मंगेशकर कुटुंबीय आणि इतर संबंधितांनी लता मंगेशकर यांच्या आरोग्याबाबत वेळोवेळी माहितीही दिली.
सध्याच्या घडीला दीदींची प्रकृती नेमकी कशी आहे, याची माहिती खुद्द रुग्णालयाती डॉक्टरांनी दिली आहे.
अद्यापही त्या Intensive Care Unit (ICU)अर्थात अतिदक्षता विभागातच आहेत, जिथे त्यांना निरीक्षणात ठेवण्यात आलं आहे.
ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी सूचक वक्तव्य करत दिलेल्या माहितीनुसार दीदींची प्रकृती स्थिक आहे. त्यांना यातून सावरण्यासाठी अपेक्षित वेळ लागणार आहे.
वय जास्त असल्यामुळं दीदीची प्रकृती पूर्वपदावर येण्यास विलंब लागत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
दरम्यान, दीदींच्या प्रकृतीसाठी देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. तेव्हा आता त्या कधी रुग्णालयातून बाहेर येतात याकडेच साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.