देशावरील ड्रोन हल्ले रोखणार आता डीआरडीओचे अँटी ड्रोन सिस्टम

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या एअरबेसवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या हल्ल्यानंतरही जम्मूच्या काही भागांमध्ये पाकचे ड्रोन गिरट्या घातल असल्याचे दिसले. यामुळे देशात पाकची हल्ल्याची नवी रणनीति मोडून काढण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. यात संरक्षण विकास आणि संशोधन संस्था या प्रकरणात सक्रिय झाली असून पाकचे ड्रोन मोडून पाडण्यासाठी अँटी ड्रोन सिस्टम तयार करत आहे.

जी. मंजुला गेली तीन वर्षे या अँटी-ड्रोन सिस्टमवर काम करत आहे. त्यांच्या मते, ही सिस्टम तीन किलोमीटरच्या परिघात येणार्या छोट्या ड्रोन्सचा शोध घेऊन ते पाडून टाकते. यासह 1 ते 2.5 किमी अंतरावर असणार्‍या ड्रोनला लक्ष्य करत लेसर बीमच्या साहाय्याने खाली त्यांना खाली पाडते. डीआरडीओने विकसित केले ही सिस्टम जॉमिंग कमांडद्वारे मायक्रो ड्रोन्सला खाली पाडू शकते किंवा लेसरवर आधारित उर्जा शस्त्रास्त्राद्वारे ड्रोनच्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे नुकसान करू शकते.

जी मंजुळा यांनी सांगितले की, येत्या 6 महिन्यांत ही सिस्टम भारतीय सैन्यासाठी उपलब्ध होईल. तर डीआरडीओने या अँटी ड्रोन सिस्टमचे उत्पादन करण्याची जबाबदारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) कडे सोपविले आहे. डीआरडीओ या सिस्टमवर अधिक काम करण्यासाठी खासगी कंपन्यांसह हात मिळवणी करण्यास तयार आहे. परंतु या खासगी कंपन्यांना परवानगी घ्यावी लागेल. यापूर्वी डीआरडीओने विकसित केलेली ही अँटी ड्रोन सिस्टम 2020 च्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने व्हीव्हीआयपी लोकांच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आली होती. या व्यतिरिक्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियम दौर्‍यादरम्यानही ही सिस्टम कार्यकरत करण्यात आली होती. त्याचबरोबर, यंदाच्या प्रजासत्ताक-दिनाच्या परेड दरम्यानही या अँटी ड्रोन सिस्टमचा वापर करण्यात आला होता.

लष्कर प्रमुख एम.एम. नरनवे यांनी सांगितले की, ड्रोनचा वापर झपाट्याने वाढत आहे. सैन्याने ड्रोनचा बचावात्मक व आक्षेपार्ह वापर करण्यावर भर दिला जात आहे, तसेच पाकच्या ड्रोनचा सामना करण्यासाठीही काम चालू आहे. एम.एम. नरवणे म्हणाले की, नियंत्रण रेषेवरील आमच्या बाजूने चर्चा चालू आहे, अलीकडे जम्मू-काश्मीरमधील घुसखोरी कमी झाली आहे आणि दहशतवादी कारवाया देखील कमी झाल्या आहेत.

 

You May Also Like