राज्यात म्युकोरमायकॉसिस चा औषधांचा तुटवडा कायम; इंजेक्शन पुरवण्याचे अधिकार केंद्रालाच : उपमुख्यमंत्री

पुणे : पुण्यामध्ये आज अजित पवार यांनी कारोना परिस्थितीचा आढावा घेतला. एकट्या पुण्यातच म्युकोरमायकॉसिस चे 300 रुग्ण असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर बोलताना पवार म्हणाले, “जिल्ह्यात 300 पेक्षा जास्त ब्लॅक फंगस चे रुग्ण असून त्याचा इंजेक्शन चा तुटवडा आहे. राज्याचा वतीने या आजाराच्या उपचारासाठी इंजेक्शन ची मागणी केली आहे.त्या  निर्मात्या कंपन्यांना आम्ही संपर्क केला पण त्यांनी सांगितलं की सगळी इंजेक्शन केंद्राला द्यायला सांगितली आहेत. राज्यात म्युकोरमायकॉसिसचा इंजेक्शन चा तुटवडा आहे. इंजेक्शनच्या वितरणाचे सर्व अधिकार मात्र केंद्राने आपल्याकडे घेतले असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण पुण्यात झाल आहे. लसींचा तुटवडा अजूनही कायम असून अधिक पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. फक्त पुण्याला 1800 इंजेक्शन लागतायत. इतकी उपलब्धता नाही. पंत्रधानांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात आली आहे. यावर काही तरी मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. “परदेशातून येणाऱ्या लसीचे वितरण कसे करायचे हा केंद्राचा निर्णय.” तसेच  लॉकडाऊन बाबत 10 दिवसांनी परिस्थीती पाहून निर्णय घेऊ असही पवार म्हणाले.

 

 

You May Also Like