‘त्या’ व्हिडीओमुळे बबिताजी विरोधात अखेर गुन्हा दाखल

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील बबीता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चर्चा मुनमुनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जातीवाचक शब्दाचा उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सुरु झाल्या होत्या. मात्र हे वक्तव्य मुनमुनला आता चांगलेच महागात पडले आहे. व्हिडीओमध्ये मुनमुनने जातीवाचक शब्दाचा उल्लेख केल्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे मुनमुन दत्ता विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

मुनमुन दत्ता आता लवकरच यूट्यूबर दिसणार असल्याने त्यासाठी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. मुनमुनने शेअर केलेल्या व्हिडीओत तिने जातिवाचक शब्दांचा वापर करत समाजातील ठराविक समूहाचा अपमान केला होता. त्यानंतर या व्हिडिओमुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. ‘मी लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी मला सुंदर दिसायचे आहे. मला *** सारखे दिसायचे नाही’ असे तिने व्हिडीओमध्ये बोलताना दिसत होती.

 

You May Also Like