द्युती चंदच्या कामगिरीमुळे भारत ‘अ’ संघाला सुवर्ण

या कामगिरीसोबत नोंदवला नवा राष्ट्रीय विक्रम
नवी दिल्ली : भारताची अव्वल महिला धावपटू द्युती चंदने इंडियन ग्रँड प्रिक्स येथे 43.37 या नवीन राष्ट्रीय विक्रमासह महिलांच्या 4ु100 मीटर रिले स्पर्धेत भारत ‘अ’ संघासाठी सुवर्णपदक जिंकले. या संघात अर्चना ए, धनलक्ष्मी, हिमा दास हे खेळाडू होते. 2016मध्ये हा विक्रम 43.42 सेकंदाचा होता. भारताच्या ‘ब’ संघाने 48.02 या वेळेसह दुसरा, तर मालदीवने 50.74 सेकंदाची वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला.

दरम्यान, महिला भाला भेक स्पर्धेत अनु राणीने 60.58 मीटरच्या कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले, तर संजना चौधरीने 53.54 मीटरच्या कामगिरीसह रौप्यपदक जिंकले. शिल्पा राणीने कांस्यपदक जिंकले.100 मीटरमध्ये द्युतीने 11.17 सेकंदाची वेळ नोंदवत आपला पूर्वीचा 11.42 सेंकदाच्या विक्रमात सुधारणा केली. मात्र तिला टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता असलेली 11.15 सेकंदाची वेळ नोंदण्यात अपयश आले. दानेश्वरी एटीने दुसरे, तर हिमाश्री रॉयने तिसरे स्थान पटकावले.

भारताच्या डिस्कस थ्रोअमध्ये कमलप्रीत कौरने 66.59 मीटर गुणांचा कमाई केली, परंतु तिच्या प्रयत्नांना राष्ट्रीय विक्रम मानले जाणार नाही कारण ती मैदानावरील एकमेव खेळाडू होती.

You May Also Like

error: Content is protected !!