प्रदुषणात घट झाल्याने उत्तर प्रदेशातुन होतेय थेट हिमालयाचे दर्शन

नवी दिल्ली : देशभरात पुन्हा एकदा करोनाने डोक वर काढलंय. देशात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाला थोपवण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे प्रदुषण कमी झालयं. आज उत्तर प्रदेशमधून थेट हिमालयच दर्शन झालं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सहारनपूर जिल्हा आहे. सहारनपूर जिल्ह्यातील आयकर अधिकरी दुष्यंत सिंह यांनी आपल्या कॅमेर्‍यात फोटो काढले आहेत. आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गल्या वर्षी म्हणजेच 2020 मधील लॉकडाउनमध्येही प्रदुषणात घट झाली होती. त्यावेळीही उत्तर प्रदेशातून हिमालयाचे दर्शन झाले होते.

उत्तर प्रदेशमध्ये सध्या अत्यावश्यक वाहतूक वगळता इतर वाहतूक व्यवस्था बंद आहेत. यामुळे गेल्या काही दिवसात प्रदूषणात घट झाली. प्रदूषणात घट झाल्याने आता दृश्यमानता वाढली आहे. त्यामुळे सहारनपूरमधून हिमालयाची शिखरं दिसत आहेत. हिमालयाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायं.

 

You May Also Like