धनंजय मुंडे यांनी दिव्यांगांसाठी घेतला मोठा निर्णय

मुंबई  : करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात कडक निर्बंध लागू केलेय. ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन करण्यात आला आहे. दरम्यान, करोनाला आळा घालण्यासाठी लावलेल्या निर्बंधांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनाही केवळ 15% उपस्थिती निश्चित केली आहे. मात्र आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय विभागाने  एक अत्यंत कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांमधील दिव्यांग कर्मचारी – अधिकारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्यातून सूट देण्यात आली आहे. त्यांना वर्क फ्रॉम होमचीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संबंधित विभागांतर्फे केला जाणार आहे.

ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यात सरकारी कार्यालयांना देखिल मर्यादीत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार सरकारी कार्यालयांमध्ये रोटेशन पद्धतीनुसार सरकारी कर्मचारी काम करत आहेत. संकटाच्या या काळात दिव्यांग कर्मचारी – अधिकारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्यातून सूट देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. हा महत्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलाय.

धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. दिव्यांग व्यक्तींचे आरोग्य आणि इतर सुविधांचा विचार करून त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यासंबंधिचा शासन आदेश देखील त्यांनी पोस्ट केला आहे.

तसेच, सामान्य नागरिकांच्या तुलनेमध्ये दिव्यांगांची रोग प्रतिकार शक्ती ही काहिशी कमी असते. त्यामुळं त्यांना अधिक धोका आहे. तसंच त्यांना इतरांच्या तुलनेमध्ये या अडचणींचा सामना करणे अधिक कठीण ठरते. त्यामुळं या सर्वांना कार्यालयीन उपस्थितीतून सूट देऊन वर्क फ्रॉम होमची मुभा देण्याचा आदेश सर्व विभागांना देण्यात आला आहे. त्यासंदर्भातील शासन आदेशही काढण्यात आला आहे. त्यामुळं शासनाच्या या निर्णयामुळं दिव्यांगांच्या अडचणी कमी होणार असून त्यांना मोठी मदत होणार आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like