आरोग्यमंत्री केके शैलजा यांना डच्चू; मंत्रिमंडळात नव्या चेहर्‍यांना संधी

केरळ : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्यांची पुन्हा एकदा सत्ता आली आहे. सीपीआय (एम)च्या राज्य समितीने पिनरायी विजयन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याबाबत खलबतं सुरु होती. मात्र नव्या चेहर्‍यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. मागच्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेल्या केके शैलजा यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलायं.

नव्या चेहर्‍यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. मागच्या सरकारमधील मुख्यमंत्री पी विजयन सोडले कुणालाच संधी मिळालेली नाही, असं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केके शैलजा यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. केरळमध्ये करोनाकाळात केके शैलजा यांनी चांगली कामगिरी केली होती. या कामगिरीची दखल देशानं घेतली होती. यापूर्वी निपाह विषाणूशी लढण्यातही केके शैलजा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. केके शैलजा या शैलजा टीचर या नावानेही ओळखल्या जातात.

You May Also Like