महिलांच्या २०० मीटर शर्यतीत दुती चंद सातव्या स्थानी; आव्हान संपुष्टात

नव्या विक्रमाची केली नोंद

टोक्यो । ऑलिम्पिक स्पर्धेत दहाव्या दिवशी धावपटू दुती चंद हिच्या कामगिरीकडे लक्ष होते. मात्र, दुतीच्या सामन्यावर नजर खिळवून बसलेल्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या २०० मीटर शर्यती दुती चंदचे आव्हान संपुष्टात आलं. दुती चंदला सातवं स्थान मिळालं. दुतीला उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नसला, तरी तिने या स्पर्धेत नवीन विक्रमाची नोंद केली आहे.

 

 

टोक्यो ऑलिम्पिकच्या दहाव्या दिवशी म्हणजेच आज भारतीयांचं धावपटू दुती चंद आणि कमलप्रीत कौर यांच्या कामगिरीकडे लक्ष लागलेलं होतं. यात दुती चंदकडून चाहत्यांची निराशा झाली. ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या २०० मीटर शर्यतीत भारताच्या दुती चंदला सेमीफायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. २०० मीटर शर्यतीत दुती चंद सातव्या क्रमांकावर राहिली.

You May Also Like