बिकानेरमध्ये भूकंपाचा धक्का ; तीव्रता ५.३ रिश्टर स्केल

राजस्थान : येथील बिकानेर शहराला आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का बसला. राजस्थान येथील या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.३ इतकी इतकी नोंदविली गेली आहे. नॅशनल तेंटर फॉर सिस्मोलॉजीने सांगितले की, आज पहाटे ५.२४ वाजता बीकानेरमध्ये भूकंप झाला मात्र यात कोणतीही वित्त किंवा जीवित्त हानी झालेली नाही.

तसेच राजस्थानच्या आधी मेघालयमध्ये रात्री २.१० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या धक्क्याची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल नोंदविण्यात आली. अहवालानुसार, भूकंपाचे केंद्रबिंदू पश्चिम गॅरो हिल्स येथे होते. परंतु, अद्यापपर्यंत मेघालयात कोणातीही वित्त किंवा जीवित्त हानी झालेली नाही.
त्याशिवाय लेह-लडाख भागातही आज पहाटे ४.५७ वाजता भूकंपाचे धक्का जाणवला, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ होती.
यापूर्वी गुजरातमधील कच्छ भागातदि दि. १८ जुलै २०२१ रोजी भूकंपाचा धक्का बसला होता. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.९ नोंदविण्यात आली होती.

या महिन्याच्या सुरूवातीला हिमाचल प्रदेश, आसाम, बंगाल आणि दिल्लीमध्येही भूकंपाचा धक्का जाणवला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like