भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक

भोसरी भूखंड प्रकरणात महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याची बातमी ताजी असतानाच, आता एकनाथराव खडसे यांना देखील इडिकडून समन्स पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे खडसे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे दिसत आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना भोसरी भूखंड प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली असून, चौधरी यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भोसरी भूखंड प्रकरणात याआधी एकनाथराव खडसे यांची देखील चौकशी करण्यात आली होती. त्यांना आता पुन्हा एकदा ईडीने समन्स पाठवले असून, ईडीने पाठवलेल्या नोटिसनुसार उद्या गुरुवारी 8 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथील कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.

You May Also Like