ईडी निघाली अनिल देशमुखांच्या शोधात! ईडीनं बजावलं पाचव्यांदा समन्स

मुंबई ।  आर्थिक व्यवहार प्रकरणात ईडीच्या कारवाईविरोधात संरक्षण मिळावं, याची मागणी करणारी याचिका अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, सोमवारी न्यायालयानं ही याचिका फेटाळल्यानंतर आता ईडीनं पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावलं आहे. ईडीनं अनिल देशमुख यांना बजावलेलं हे पाचवं समन्स आहे. उद्या म्हणजेच बुधवारी सकाळी राज्याच्या माजी गृहमंत्र्यांना ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले असून आता तरी अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांसंदर्भात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईमध्ये ईडीनं आत्तापर्यंत अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याभोवतीचा ईडीचा फास अधिकाधिक आवळला जात आहे. नुकतेच ईडीनं अनिल देशमुख यांना पाचव्यांदा समन्स बजावले आहेत.

You May Also Like