प्रताप सरनाईकांच्या बंगल्यावर ईडीचा छापा?

मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार प्रताप सरनाईक बेहिशोबी मालमत्ता प्रकरणामुळे ईडीच्या रडारवर असून, त्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. सरनाईक यांच्या लोणावळा येथील बंगल्यावर ईडीच्या अधिकार्‍यांनी छापा टाकला असुन ईडीचे अधिकारी सरनाईक यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत, अशी अधिकृत माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. टॉप्स ग्रुप(सिक्युरीटी) कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत ईडीकडून चौकशी केली जात असलची माहिती मिळतेयं.

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) नोव्हेंबर 2020मध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या. त्यानंतर सरनाईक यांच्यासह त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची चौकशी करण्यात आली. ईडीने टॉप्स ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात 25 नोव्हेंबरला अमित चांदोळे यांचीही चौकशी केली. त्यानंतर अमित चांदोळे यांना अटक करण्यात आली.
संबंधित अधिकारी बाहेरील सीसीटीव्ही चेक करत असल्याची माहिती सूत्रांकडुन मिळतेय.

You May Also Like

error: Content is protected !!