राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंना ईडीकडून मोठा झटका देण्यात आला

मुंबई : भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंना ईडीकडून मोठा झटका देण्यात आला आहे. एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीने अटक केली आहे. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावाई गिरीश चौधरी हे सध्या ईडीच्या अटकेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे ईडीच्या तपासाचा ससेमिरा लागल्याचे दिसत आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यानंतर आता एकनाथ खडसेंकडे ईडीने मोर्चा वळवला आहे.

भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीनं अटक केली आहे. काल गिरीश चौधरी यांना ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

रात्री उशीरापर्यंत ईडीकडून त्यांची चौकशी सुरु होती. अखेर चौकशी अंति ईडीकडून त्यांच्यावर रात्री उशीरा अटकेची कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सध्या ईडीकडून तपास सुरु आहे.

You May Also Like