‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेकडून आता कायदेशीर लढाई !

मुंबई : शिवसेनेची निशाणी ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे हे कायदेशीर लढाई लढवतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. शिंदे यांच्यासोबत सध्या 40 पेक्षा जास्त आमदारांची असून शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार शिंदेंच्या गोटात असल्याची माहिती सर्वाना झाली आहे. या सगळ्यात आता ‘मूळ पक्ष’ म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरु करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी भाजपाची टीम मदत करत असल्याचे देखील माहिती मिळत आहे.

आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पत्र सादर केल्यानंतर शिंदे सत्तास्थापनेचा दावा करतील, अशी माहिती सूत्रांना मिळत आहे. तसेच आज राज्यपालांना पत्र पाठवून मविआकडे संख्याबळ नसल्याचा दावा करण्याची शक्यता आहे.

नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख ठरली आहे. भाजपसोबत सरकार स्थापन करणार अशी शक्यता आहे. रविवार 3 जुलै रोजी शपथविधी असल्याची माहिती माध्यमांना सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाला भाजपकडून उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदासह 12 मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like