दोंडाईचा येथे जुगार खेळणाऱ्या दोन नगरसेवकांसह अकरा जणांवर गुन्हा दाखल

धुळे एलसीबीची कारवाई 

दोंडाईचा ।  दोंडाईचा-शहादा रस्त्यावर नगरसेवकाच्या बंद पडलेल्या जेवणाच्या धाब्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर काल रात्री दहा वाजेच्या सुमारास  धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला. यावेळी दोन नगरसेवकांसह अकरा जणांवर जुगार खेळण्याचा गुन्हा दाखल झाला असुन, त्यांच्याकडून चार लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत दोंडाईचा पोलीस स्टेशनमध्ये जुगार अँक्टच्या विविध भादवि खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवार रात्री दहा ते एकच्या सुमारास दोंडाईचा-शहादा रस्त्यावर नगरसेवक छोटू नामदेव मराठे यांच्या मालकी हक्काच्या पत्र्याच्या शेडमधील बंद पडलेल्या हाँटेल द्वारकाच्या पाठीमागील शेतात बंदीस १) फकिरा दशरथ थोरात (वय.3७ रा. आंबेडकर चौक दोंडाईचा), २) संजय सुर्यकांत लोहार (वय. ५२ रा. सर्वोदय कॉलनी दोंडाईचा),  ३) कृष्णा नथ्थु कोळी (वय. ३६, रा. वाल्मिक नगर सांरगखेडा), ४) नगरसेवक छोटू नामदेव मराठे (वय.४६ रा. मालपुर रोड दोंडाईचा), ५) संतोष उर्फ अरुण मराठे (रा. डाबरी.घरकुल), ६) अशोक उत्तम  महाजन, (रा. राऊळ नगर दोंडाईचा), ७) राजधर कोळी (रा. रेल्वे कॉलनी दोंडाईचा), ८) भटु श्रीराम पाटील (रा. मंदाणे), ९) इम्रान खान उर्फ डमरु भाई ( रा.दोंडाईचा पूर्ण नाव माहीत नाही), १०)नगरसेवक नरेंद्र नाना कोळी (रा. सरकारी दवाखाना दोंडाईचा) ११) अशोक श्रीराम पाटील (रा. धावडे) असे सांगितले. यांच्या विरुद्ध  स्थानिक गुन्हे अन्वेषण मध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सागर शिर्के यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक १८८७ चे कलम ४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन जणांनी त्यांचे नाव गाव सांगितल्याने त्यांची अंगझडती घेतली असता १६ हजार ५००/ रुपये रोख, तीन मोबाईल, ५२ पत्यांचा नवीन कॅटचा बॉक्स, १२ दुचाकी असा एकूण ४ लाख ४९ हजार ८७०/ रुपये किमंतीचा मुद्देमाल पोलिसांनी जागेवरून हस्तगत केला आहे.

 तसेच सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, उपअधीक्षक प्रशांत बच्छाव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली साहय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, उपनिरीक्षक सुशांत वळवी, पोहेकॉ रफिक पठाण, पोहोक प्रकाश सोनार, पोना संदीप पाटील, राहुल सानप, गौतम सपकाळे, पोकॉ सागर शिर्के, चालक पोहेकॉ संजय सूर्से, चालक पोकॉ कैलास महाजन यांनी केली आहे.

You May Also Like