कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषदेप्रकरणी तुरुंगात टाकलेले निरपराध तुरुंगातच सडणार का? – प्रकाश आंबेडकर

मुंबई : एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरण केंद्र सरकारने एनआयएकडे सोपवले आहे. यावर राज्यातील नेत्यांकडून संशय वक्त केला जात असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेवरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे

एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून आपली भूमिका मांडली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा ही प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच केंद्राकडे का पाठवले नाही,” असा सवाल आंबेडकर यांनी विचारला आहे.

पोलिसांनी ज्यांना अटक केलेली आहे, ते एल्गार परिषदेशी संबंधित नाही. एल्गार परिषद, कोरेगाव भीमा दोन्ही वेगळे मुद्दे आहेत. पुणे शहर पोलीस आणि ग्रामीण पोलीस यासंदर्भात तपास करत आहेत. पण, पोलिसांनी पकडलं म्हणून काही कार्यकर्ते तुरूंंगात आहेत. त्यांना नक्षलवादी म्हणून अटक करण्यात आलेली आहे, ते तुरूंगातच सडणार का? असा मूळ प्रश्न आहे,” असा सवाल आंबेडकरांनी केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा…

 

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.