अंजलीला एलिमिनेट केल्यानं युझर भडकले

मुंबई : इंडियन आयडल 12 मधून नचिकेत लेले याला एलिमिनेट केल्यानंतर आता अंजली गायकवाड हिला बाहेर काढले आहे. त्यामुळे तिचे चाहते कमालीचे नाराज झाले आहे. अंजलीच्या चाहत्यांना तिचे गाणे खूप आवडते. कार्यक्रमाचे परीक्षक, येणारे पाहुणेदेखील अंजलीच्या गायकीचे भरभरून कौतुक करायचे. त्यानंतरही अंजलीला या कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले, त्यामुळे तिचे चाहते खूपच नाराज झाले आहेत. इतकेच नाही तर कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी तिला कार्यक्रमात परत घ्यावे अशी मागणी जोर धरू लागलीयं.

अंजलीला कार्यक्रमातून एलिमिनेट केल्यानंतर तिच्या चाहत्यांना राग अनावर झाला आहे. त्यांनी आपला राग शनमुखा प्रिया आणि दानिशवर काढला. गेल्या आठवड्यात प्रसारित झालेल्या कार्यक्रमात शनमुखा प्रियाने आशा भोसले यांनी गायलेले मचुरा लिया है तुमनेफ हे गाणे तिने गायले. परंतु तिने ज्या पद्धतीने हे गाणे सादर केले ते प्रेक्षकांना अजिबातच आवडले नाही. त्यांनी शनमुखाला कार्यक्रमातून काढून टाकण्याची मागणी केली. शनमुखा आणि दानिश चांगल्या गाण्याची अतिशय वाट लावतात, असा आरोपही अनेक युझरने सोशल मीडियावर केला.

You May Also Like

error: Content is protected !!