दक्षिण काश्मीरमध्ये दहशत पसरवणाऱ्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर । काश्मीरच्या  अवंतीपोराच्या  पंपोर  भागात आज भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. बराच तास चाललेल्या चकमकीनंतर  भारतीय सैन्यानं दोन दहशतवाद्यांच्या खात्मा केला. ठार झालेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनच्या  हिट स्क्वॉयडचा एक भाग होते. तसंच त्यांनी दक्षिण काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांची हत्या ही केली होती. दहशतवाद्यांकडून एक रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

 

 

दरम्यान, गुरुवारी श्रीनगरच्या सराफ कदल भागात सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन पोलिसांसह तीन जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर ग्रेनेड फेकलं. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर ठार झालेल्या एक दहशतवाद्याचा नाव मुसाएब मुश्ताक असल्याचं सांगितलं जात आहे. काश्मीरच्या आयजीपी विजय कुमार यांनी सांगितलं की, मुसाएब हा खिरयूचा रहिवासी आहे. त्यानं 23 जुलैला सरकारी शाळेतील एका शिपायाची हत्या केली होती.

You May Also Like