भारतीय संघाला इंग्लंडने नाकारली स्पेशल सूट; जाणुन घ्या कारण

मुंबई : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या खेळाडूंना आपल्या देशात यायला परवानगी दिली आहे. करोना रुग्णसंख्येमुळे इंग्लंडने दोन्ही देशांना रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. खेळाडूंना इंग्लंडला यायला परवानगी देण्यात आली असली, तरी त्यांच्या कुटुंबाला इंग्लंडमध्ये जाता येणार नाही. भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसह इंग्लंडविरुद्ध 5 टेस्टची सीरिज खेळणार आहे.

टीम इंडियाचे खेळाडू जवळपास 4 महिने इंग्लंडमध्ये राहणार आहेत, त्यामुळे त्यांनी कुटुंबाला घेऊन तिकडे जाण्याची इच्छा वर्तवली होती. खेळाडूंना सरकारच्या क्वारंटाईन सेंटरमध्येही राहावं लागणार नाही. साऊथम्पटनच्या जवळ असणार्‍या रोज बाऊल स्टेडियममध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा सामना होणार आहे. याच स्टेडियममध्ये हॉटेल असल्यामुळे खेळाडू तिकडेच राहतील. भारताची महिला टीमही पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये एक टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी-20 खेळणार आहेत.

इंग्लंड क्रिकेट बोर्ड जुलै महिन्यात द हंड्रेड स्पर्धा सुरू करणार आहे, यासाठी ही सूट देण्यात आलेली नाही, त्यामुळे पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या या स्पर्धेत खेळण्याबाबत अजून काहीही स्पष्ट झालेलं नाही.

You May Also Like