देशात महामारी, तर पंतप्रधान अहंकारी: राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टिका

नवी दिल्ली : एक तो महामारी और उस पर प्रधान अहंकारी, असं दिलं आहे. राहुल यांनी ट्विट केलेल्या बातमीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केंद्र सरकारवर केलेल्या आरोपांची माहिती देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या गाइडलाइननुसार देशात लसींचा साठा उपलब्ध नसतानाही केंद्र सरकारनं लसीकरणाची घोषणा केली, असा आरोप सीरमच्या सुरेश जाधव यांनी केल्याची बातमीच राहुल गांधींनी ट्विट केलीय.

राहुल गांधी याआधी देखील लसीच्या तुटवड्यावरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. शनिवारी राहुल गांधी यांनी मोदींच्या कुशासनामुळे देशात घडत असलेल्या अनागोंदीवर भाष्य केलं होतं. केंद्र सरकारच्या कुशासनामुळे आता ब्लॅक फंगस रोगाचाही प्रादुर्भाव वाढला आहे. लसींचा तुटवडा तर आधीपासूनच आहे. त्यात आता नव्या रोगाची भर पडलीय आणि याचा सामना करण्यासाठी पंतप्रधान लवकरच टाळ्या आणि थाळ्या वाजवायचा कार्यक्रम हाती घेणार आहेत, असा टोला राहुल गांधी यांनी लागवला होता.

मोदी सिस्टम के कुशासन के चलते स़िर्फ भारत में करोना के साथ-साथ ब्लैक ़फंगस महामारी है। वैक्सीन की कमी तो है ही, इस नयी महामारी की दवा की भी भारी कमी है। इससे जूझने के लिए झच् ताली-थाली बजाने की घोषणा करते ही होंगे।

देशात गेल्या 24 तासांमध्ये करोनाचे 2 लाख 40 हजार नवे रुग्ण आढळले, तर 3741 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यात आता म्यूकरमायकोसिस अर्थात काळ्या बुरशीच्या आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या आजारावरील औषधांच्या तुटवड्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. याच गोष्टीवरुन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

You May Also Like