दोन्ही डोस घेतल्यानंतरही २६ वर्षीय डॉक्टर दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह

मुंबई । भारतातही करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु आहे. एकीकडे लसीकरण मोहिमेने वेग घेतला असून दुसरीकडे लसीच्या परिणामकारकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.  करोना प्रतिबंधक लसी विषाणूच्या नव्या अवतारावर परिणामकारक ठरतील का याबाबत तज्ज्ञांमध्ये देखील मतभिन्नता असल्याचं दिसतंय. अशातच  मुंबई येथील एका महिला डॉक्टरला लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर देखील विषाणूची दोनदा बाधा झाली आहे.

 

येथील वीर सावरकर रुग्णालयात कोविड कक्षात कार्यरत असलेल्या श्रुष्टि हिलारी या २६ वर्षीय डॉक्टरला दोनदा बाधा झाली आहे.

 

श्रुष्टि यांना गतवर्षी जून महिन्यामध्ये प्रथम करोना विषाणूची बाधा झाली होती. यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांसह ८ मार्चला करोना लसीचा पहिला डोस घेतला. यानंतर २९ एप्रिलला लसीचा दुसरा डोस घेतला. मात्र यानंतर श्रुष्टि यांना २९ मे ला दुसऱ्यांदा करोनाची बाधा झाली.

You May Also Like

error: Content is protected !!