“देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहीजे”; राहुल गांधींची मागणी

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. देशभरात प्रतिदिन तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. तसेच ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन यांचा तुटवडा जाणवत आहे.अनेक रुग्णांना प्राणाला मुकावं लागत आहे. करोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर अधिकाधिक भर दिला जात आहे. देशातील तिसऱ्या टप्प्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. अनेक राज्यांनी करोना लस मोफत मिळेल, असे जाहीर केले आहे. त्याचबरोबर करोना लसींच्या किंमतींवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरु झाला आहे.

अशातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी संपूर्ण देशवासीयांना कोरोनाची लस मोफत मिळावी, अशी मागणी केली आहे. “चर्चा खूप झाली. आता देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहीजे. बस एवढंच..भारताला भाजपाच्या सिस्टमचा विक्टिम बनवू नका”, असं टीकास्त्र त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून सोडलं आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like