कोरोनाविरुद्ध लढाई लढण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत आहेत. अनेक नव नवीन वैज्ञानिक प्रयोग

देशात कोरोनाविरुद्ध लढाई लढण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत आहेत. अनेक नव नवीन वैज्ञानिक प्रयोग, शोध घेत कोरोनावर यशस्वीरित्या मात कशी करता याचा अभ्यास केला जात आहे. आत्तापर्यंत भारतात कोरोनावरील उपचारांसाठी केंद्र सरकारने अनेक आरोग्यविषयक चाचण्या, औषधांना मान्यता दिली. परंतु अनेकदा कोरोना संसर्गाची तीव्रता समजेपर्यंत उशीर होत असल्याने वेळीच योग्य उपचार करताना अडचणी निर्माण होत आहे. यामुळे कोरोना संसर्ग कमी वेळात फुफ्फुसांपर्यंत पोहचतोयं. परंतु यावर मार्ग काढत आता केंद्र सरकारने आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म एक्सरे सेतू’ ही यशस्वी यंत्रणा राबवली आहे. ‘एक्सरे सेतू’ च्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णाच्या फुफ्फुसांतील कोरोना संसर्गाची माहिती अगदी कमी वेळात मिळणार आहे.

ग्रामीण भागांत सध्य़ा कोरोना संसर्ग अधिक प्रमाणात पसरत आहे. यामुळे कोरोना चाचण्या करण्यासही वेळ लागत आहे. यात अनेकदा नव नव्या व्हेरियंटमुळे कोरोनाची लागण झाली असतानाही आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येतेयं. यावेळी रुग्णास ‘एक्सरे सेतू’ मदतीला येत आहे.
‘एक्सरे सेतू’ हा खास कोरोनाबाधितांसाठी तयार केलेली एक ऑनलाईन यंत्रणा आहे. ज्यामाध्यमातून रुग्ण कोरोना संसर्ग आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहचला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्या छातीचा एक्सरे डॉक्टरांना एक्सरे सेतूवर व्हॉट्सअ‍ॅप करु शकतात. याच पूर्ण प्रक्रियेला ‘एक्सरे सेतू’ असे नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून रुग्ण कमी रेजोल्यूशनचे फोटो मोबाईलच्या माध्यमातून पाठवू शकतात. यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांवर त्वरीत उपचार करणे शक्य होणार आहे. भारतीय विज्ञान संस्थान, आणि बंगळुरुमधील नॉन फॉर प्रॉफिट फाउंडेशन आर्टपार्क विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने एक्सरे सेतू व्यवस्था तयार करण्यात आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यामातून कमी रिझोल्यूशचे छातीचा एक्स-रे पाठवित कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या फुफ्फुसांना कोरोना संसर्ग झाला आहे. की नाही ते समजून घेण्यासाठी एक्सरे सेतू मदत करत आहे.

You May Also Like

error: Content is protected !!