देशात सर्वांना मोफत लस मिळणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

मुंबई : करोनाशी लढा देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत असताना आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा केली. देशात यापुढे सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे, राज्यांवरील जबाबदारी ही आता केंद्राकडेच असणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. 21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस दिली जाणार आहे.

21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, त्या निमित्ताने 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत लस देणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून पुढील कार्य पूर्ण करायचे आहे, असंही मोदींना स्पष्ट केलं.

1 मेपासून 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याचे काम राज्यांवर 25 टक्के सोपवले होते. त्यांनी आपल्या परीने काम केले. पण, हे काम करत असताना किती अडचणी येतात हे लक्षात आहे. संपूर्ण देशात काय परिस्थिती आहे. ते यांच्या लक्षात आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आणि लोकांकडून लशी मागणी वाढली. त्यामुळे राज्य सरकारांना कळून चुकले की पहिली व्यवस्था ही चांगली होती. एक चांगली गोष्ट राहिली, राज्य सरकार हे फेरविचार करून आमच्याकडे आले आणि देशातील नागरिकांना त्रास होऊ नये. त्यामुळे राज्य सरकारच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राकडे घेण्यात आली आहे. देशातील सर्व लोकांना मोफत लस मिळणार आहे, अशी घोषणा मोदींनी केली.

You May Also Like

error: Content is protected !!