किसपासुन ते अंघोळीपर्यंत सर्वकाही दिसतंय जगासमोर; झुमचे हटके किस्से

मुंबई : साधारणत: दीड वर्षापूर्वी करोनाने थैमान घालायला सुरुवात केली. अन् माणसांच्या प्रत्यक्ष भेटण्यावर बंधनं आली. झूम, गुगल मीट आणि अन्य तशाच व्हिडिओ चॅट सर्व्हिसेस वापरणं हा बैठका, चर्चा आणि संवादासाठी एकमेव मार्ग उरला. लोकांना या प्रकारच्या संवादाची सवय नसल्यामुळे त्यातून अनेक गमतीजमती घडल्या, काही गंभीर प्रकारही घडले. कॅमेरा ऑफ आहे आणि माइक म्यूट आहे असं समजून अनेकांनी केलेल्या विचित्र गोष्टी जगाच्या नजरेला पडल्या आणि अनेकांनी आपलं हसं करून घेतलं.

शर्ट न घालताच आले कॅमेर्‍यावर
ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्यासोबत झूम व्हिडिओ कॉल सुरू असताना एक उद्योगपती चक्क आंघोळीला गेले होते. त्या वेळी ते कॅमेरा बंद करायला विसरले. त्यामुळे जे व्हायचं तेच झालं. या मीटिंगचा स्क्रीनशॉट नंतर सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला. त्यात हा उद्योगपती अंगावर शर्ट नसलेल्या अवस्थेत मीटिंगच्या चॅट बॉक्समध्ये असल्याचं दिसत आहे.

अशाच एका झूम व्हिडिओ कॉलची एक क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात पती मीटिंगमध्ये व्यग्र असल्याचं दिसत आहे. तेवढ्यात त्याची पत्नी खोलीत येते आणि त्याला किस करण्यासाठी खाली वाकते. हडबडलेला पती तिला ढकलून देतो. महा काय नॉन-सेन्स आहे. कॅमेरा सुरू आहे,फ असं तो पत्नीला सांगत असल्याचं ऐकू येतं. पत्नी मात्र या रागावलेल्या पतीकडे पाहून स्मितहास्य करताना दिसते.

झूम क्लासची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्या क्लासमध्ये श्वेता नावाची मुलगी अजाणतेपणे तिच्या सेक्स-अ‍ॅडिक्ट (सेक्सचं व्यसन असणार्‍या) मित्राची गोष्ट कुणाला तरी सांगत होती. ती गोष्ट मीटिंगमधल्या सर्वांना ऐकू गेली. कारण तिने माइक म्यूट करतोय असं समजून स्पीकर म्यूट केला होता.

You May Also Like