चक्क मंत्रालयात सापडला दारूच्या बाटल्यांचा खच?

मुंबई |  राज्यभराचा कारभार ज्या मंत्रालयातून चालवला जातो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळून आल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. मंत्रालयाच्या उपहारगृहातील राजपात्रित अधिकाऱ्यांच्या एका खोलीत दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे.

 

मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमुर्तीच्या मागील बाजूस बाटल्यांचा ढिगारा बघायला मिळाला आहे. मंत्रालयाचा सगळा भाग सीसीटीव्ही कॅमेरेच्या निगराणीखाली असूनसुद्धा या बाटल्या आत आल्या कुठुन आणि त्या कोणी मागवल्या आहेत. त्याचा अजूनही तपास लागलेला नाही.

 

सामान्य लोकांना मंत्रालयात सहज प्रवेश दिला जात नाही. कामानिमित्त लोकांना मंत्रालयात प्रवेश करायचा असल्यास तेथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची कडक बंदोबस्तात चौकशी केली जाते. अशातच दारूच्या बाटल्या सापडल्याने मंत्रालयाच्या या भोंगळ कारभारावर सगळ्या स्तरातून टीका होत आहे. तर मंत्रालयाची कडक सुरक्षा यंत्रणा भेदून दारूच्या बाटल्या आत आल्याच कशा?, असाही प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जात आहे.

You May Also Like