तन्मय फडणवीस यांना लसीचा दुसरा डोस दिल्याबद्दल रुग्णालयान दिले स्पष्टीकरण..

मुंबई : राज्यातील वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लसींचा तुटवडा निर्माण झाला असून, अनेक लसीकरण केंद्र बंद आहेत. तसेच राज्याचा राजकारणात यावरून चांगलाच गदारोळ निर्माण झालाय. अशातच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीसला पात्र नसतानाही लसीचा दुसरा डोस मिळाल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. एकीकडे सर्वसामान्यांना सुविधा मिळत नसताना तन्मय फडणवीस यांना लस कशी मिळाली असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान तन्मय फडणवीसला लसीचा डोस देणाऱ्या नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने यासंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

तन्मय फडणवीस यांनी घेतली लस ; देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण म्हणाले…

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश जोगळेकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की, “तन्मय फडणवीसने आमच्याकडे लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईमधील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्याने पहिला डोस घेतला होता. त्याला कोणत्या निकषाद्वारे पहिला डोस देण्यात आला याची कल्पना नाही. त्याने आम्हाला प्रमाणपत्र दाखवल्यानंतर आम्ही आमच्या सेंटरमध्ये दुसरा डोस दिला”.

दरम्यान, तन्मय फडणवीसने नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (NCI) लसीचा दुसरा डोस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. वाद झाल्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like