आशिष कुलकर्णीच्या एलिमिनेशनवर भडकले चाहते

मुंबई । ‘इंडियन आयडल’चं बारावं पर्व चांगलंच चर्चेत आलं आहे. शोमधील अनेक सत्य समोर आल्याने नेटकर्‍यांकडून वेळोवेळी या शोवर आणि शोमधील जजेसवर टीका कऱण्यात आली. याच आठड्यात देखील ‘इंडियन आयडल’मधील एक दमदार स्पर्धक स्पर्धेच्या बाहेर गेलाय. या आठवड्यात स्पर्धक आशिष कुलकर्णीचं एलिमिनेशन झाल्याने चाहते चांगलेच संतापले असून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

आशिषच्या एलिमिनेशन नंतर आता शोमध्ये पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल , मोहम्मद दानिश, सायली कांबळे,शनमुखप्रिया आणि निहाल तारो हे स्पर्धक उरले आहेत. यातील शनमुखप्रियाला या आधी तिच्या गाण्याच्या स्टाइलवरून अनेकदा ट्रोल करण्यात आलंय. शिवाय तिला या शोमधून बाहेर करावं अशी मागणी करण्यात आलीय. मात्र आशिष शोमधून बाहेर झाल्याने नेटकर्‍यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केलाय. आशिषचं एलिमिनेशन करण्याचा निर्णय योग्य नसल्याचं अनेकांचं मत आहे.

एक युजर म्हणाली, आशिष कुलकर्णीच्या एलिमिनेशनमुळे इंडियन आयडल शोमधील विश्वास आणि रस पूर्ण नाहिसा झालाय. तो शोमधील एक उत्कृष्ट आणि अष्टपैलू गायक होता. ट्रॉफी कोणाला द्यायची हे तुम्ही आधीच ठरवलं आहे वाटतं. वाईट राजकारण असं म्हणत या युजरने संताप व्यक्त केलाय.

You May Also Like

error: Content is protected !!