शेवंता’च्या पुनरागमनासाठी चाहते उत्सुक!

मुंबई । झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’  या  मालिकेने प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवले आहे. पहिल्या दोन भाग यांना  चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. मात्र तिसरा सिझन सुरु झाला आणि करोनामुळे चित्रिकरणालाच ब्रेक लागला. मात्र, आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
‘रात्रीस खेळ चाले 3’ साठी प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली  आहे. तर  पुढच्याच आठवड्यापासून ही मालिका पुन्हा झी मराठीवर रुजू होत आहे.  16 ऑगस्टपासून नव्या वेळेनुसार सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता या मालिकेचं प्रसारण होणार आहे. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इतकेच नाही तर, आता शेवंता घायला नाही तर घातच करणार असे देखील म्हटले आहे.

You May Also Like