शेतकरी बांधवांना अनेक अडचणी असून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली

जळगाव : शेतकरी बांधवांना अनेक अडचणी असून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, अल्पभूधारक १०० शेतकऱ्यांना रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार, रुशील मल्टिपर्पज फाउंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे बाय व्ह्यूतर्फे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते बियाणे आणि खत वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जिल्हा कृषी उपसंचालक अनिल भोकरे, रोटरी क्लब जळगाव स्टारचे अध्यक्ष धनराज कासट, उडाण फाऊंडेशनच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, संदीप पाटील, सागर मुंदडा, डॉ.विद्या चौधरी, चेतन वाणी, धर्मेश गादीया, डॉ.महेंद्र माल, नीरज अग्रवाल, चंद्रशेखर नेवे, रविंद्र पाटील आदी उपस्थित होते.

You May Also Like