धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा कंपनीने भरपाई द्यावी

धरणगाव : धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा कंपनीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे गोपाल पाटील यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी खरीप पिक विमा काढला त्या शेतकऱ्यांना त्वरित पिक विमा कंपनीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे गोपाल पाटील यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन उपस्थित होते.

You May Also Like