बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

नाशिक  : पेठ तालुक्यातील  नालशेत येथे दिवसा भात लावणीचे काम सुरु असताना नालशेत शिवारातील (विहीरीचा माळ ) येथे भात लावणी करणारे शेतकरी सोमनाथ देवराम पवार (वय ४८) यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला.  सोमनाथ यांनी त्यास प्रतिकार करीत आरडा ओरड सुरु केल्याने लगतच काम करणारे ग्रामस्थ मंडळी मदतीसाठी एकवटल्याने बिबटयाने तेथून पळ काढला.

सदरची घटना वन विभागाला माहिती पडताच वनरक्षक दळवी त्वरित दाखल झाले.  बिबट्याच्या हल्ल्याची माहिती वरिष्ठाना कळवून  त्यांनी जखमी पवार यांना पेठच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

 

You May Also Like